ताज्या बातम्यामुंबई

क्रिकेटच्या मैदानात एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी

मुंबई | Eknath Shinde ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेला रविवार १५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग करून चेंडू हद्दपार लावलाय.

ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने ही स्पर्धा आयोजित केली होती. यंदा या स्पर्धेसाठी अनेक संघ सहभागी झाले आहेत. टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी वेळात वेळ काढून मुख्यमंत्री या स्पर्धेसाठी हजर राहिले होते.

वर्ल्ड इकोनोमिक फोरमने स्विझर्लंड येथील डाव्होस येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, टेंभी नाका शाखेचे शाखाप्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर, नितेश पाटोळे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये