ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

अब्दुल सत्तारांचे नियोजित दौरे रद्द; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ‘आठ’ दिवस अज्ञातवासात?

बुलढाणा : (Eknath Shinde On Abdul Sattar) नेहमीच आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात आडकणारे शिंदे गटाचे आमदार आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकादा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे शिवीगाळ केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, काल आणि आज राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक आंदोलने करण्यात आली आहेत. या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांचा आजचा बुलडाणा जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिल्याने सत्तार यांनी दौराच रद्द केला.

हे प्रकरण शांत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना आठ दिवस कुठल्याच सावर्जनिक ठिकाणी न जाण्याची सूचना केल्याचं सांगितलं जात आहे. तर, सध्या अब्दुल सत्तार ‘नॉट रिचेबल’ असून ते आठ दिवस अज्ञातवासात राहू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळते. त्यामुळे सत्तारांना ही शिवीगाळ चांगलीच अंगलट आल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये