ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं पद्धतशीर काम होईल,…”; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खंत?

पुणे : (Eknath Shinde On all Journalist) सुरुवातीला काही पत्रकार म्हणायचे तुम्ही दोघेच (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) आहात, तोपर्यंत निर्णय घ्या. दुसरे आल्यानंतर निर्णय घेताना अडचणी येतील. मग आम्ही निर्णय घेतले की हे दोघेच मंत्रिमंडळ चालवत आहेत, अशा बातम्याही करायचे, अशी मिश्कील टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पत्रकारांवर केली.

दरम्यान म्हणाले, मला वाटलं की मुख्यमंत्री झाल्यावर पद्धतशीर काम होईल, पण उलट झालं. आता व्याप आणखीनच वाढत चालला असल्याचे ते म्हणाले. चार महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांना बातमीचा मसाला दिला. ते का घडलं, का केलं हे माहीतच आहे. मी मनात काही ठेवत नसल्याचेही ते म्हणाले. 

पुढे शिंदे म्हणाले, राजकीय मंडळींप्रमाणेच पत्रकारांना आपल्या कुटुंबाला म्हणावा तितका वेळ देता येत नाही. मीडियात मोठा बदल होत असल्याने पत्रकारांची जबाबदारी वाढलेली आहे. सोशल मीडियाने बातमीची सत्यता पडताळणी हे एक मोठं आव्हान पत्रकारांसमोर उभं असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये