“राहुल गांधींनी सावरकर ज्या तुरुंगात राहिले तिथं एक दिवस राहून दाखवावं”; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : (Eknath Shinde on Rahul Gandhi) अंदमानातील सेल्युलर तुरुंगात सावरकरांना ठेवण्यात आलं होत. राहुल गांधी यांची खासरदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे असं म्हणाले आहेत.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ”सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांनी केला आहे. आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला. सावरकर हे फक्त महाराष्ट्र नाही, तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी देशासाठी मरणयातना भोगल्या आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत. राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून यावं आणि त्यांना फक्त एक तास घाण्याला झुंपलं तर त्यांना त्या यातना कळतील. म्हणून याचा निषेध करावं तितकं कमी आहे,” असं ते म्हणाले.
खासदारकी रद्द झाल्यानंतर आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ज्या भाषणामुळे त्यांना शिक्षा झाली त्याबद्दल माफी मागायला ‘मी सावरकर नाही’, असं ते म्हणाले आहेत. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं आहे.