ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला गुवाहाटीत असतानाचा श्री श्री रविशंकर यांचा फोनकॉलवरचा ‘तो’ प्रसंग!

जालना : (Eknath Shinde On Shri Shri Ravishankar) आज जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जलतारा- जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे’ ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री श्री रविशंकर यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “आम्ही गुंतवणूक आणण्यासाठी डाव्होसला गेलो होतो. तिथेही गुरुदेव आम्हाला भेटले. डाव्होसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते प्रत्यक्षात आणण्याचे काम आम्ही करुच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

“महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आज या भूमीमध्ये श्री श्री रविशंकर आले आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही लढाई सुरु केली आहे. ते म्हणाले, “तुम्ही चांगले काम करत आहात. तुम्हाला यश मिळेल.” गुरुदेव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये