रश्मी ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यात, शिवसेना-शिंदे गटात वादाची ठिणगी पडणार?

ठाणे : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेना पक्षात कधी नव्हे तेवढी दरी निर्माण झाली आहे. त्याचा प्रत्येय कित्येक वेळी आला आहे. त्यात आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटात वाद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचे कारण म्हणजे, रश्मी ठाकरे या टेंभी नाका येथिल दिवांगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापना केलेल्या मानाच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामध्ये जाणार आहेत. शिवसेनेच्या बंडाळीचे धार्मिक कार्यक्रमातही पडसाद उमटताना दिसत आहेत. टेंभी नाक्यावरील या देवीवर देखील शिंदे गटाने आपला हक्क सांगितला आहे. याच देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार असल्याने वादाला तोंड फुटणार आहे.
राज्यातील शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सध्या विस्तव जात नाही. तोच वादाचा भडका उडणाता दिसत आहे. त्यामुळे सध्याचं तापलेलं राजकीय वातावरण पाहता रश्मी ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यात वादाची ठिणगी पडणार तर नाही, हा प्रश्न उपस्थित आहे आहे.