ठाण्यातील शिवसेना आणि शिंदे गटात शाखेवर दावा करण्यासाठी राडा!

ठाणे : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कुंभारवाडा शाखेत बसले असताना त्यांची कळ काढण्यासाठी त्या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले मग थोडी बाचाबाची झाली अन् त्याचे रुपांतर वादत झाले. यावेळी शिंदे गटातील स्थानिक लोकांनी शाखेवर हक्क दाखवल्यामुळे त्यासाठी शिवसेनेने जोरदार विरोध केला. यावेळी दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
दरम्यान, यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या वादाची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. वाद अधिकच चिघळला. कुंभारवाडा इथल्या शिवसेनेच्या शाखेची डागडुजी आणि देखभाल वर्षानुवर्षे आम्हीच करत आहोत, असं सांगत शिंदे गटाने या शाखेवर दावा सांगितला.
तर दुसऱ्या बाजूला शिवसैनिकही तितकेच आक्रमक होते. त्यामुळे हा वाद चिघळला. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत या शाखेला टाळं लावण्यात आलं. या टाळ्याच्या दोन चाव्यांपैकी एक चावी ठाकरे गट आणि एक चावी शिंदे गटाकडे देण्यात आली आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते याठिकाणी वेगवेगळ्या वेळेत बसतील, असा तोडगा तूर्तास काढण्यात आला आहे.