अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेनेला विरोध आणि भाजपच्या मदतीसाठी शिंदेंची नवी खेळी,
मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) तोंडावर आलेल्या अंधरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेला विरोध आणि भाजपला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक नवी खेळी खेळली आहे. त्यांनी या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शिंदेंनी निवडणूक आयोगाला शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण या चिन्हाचा शिवसेनेकडून गैरवापर करण्यात येत असल्याचे कारण देत, लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. हा निर्णय लवकर लागला नाही तर अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्यासाठी बंधन येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शिवसेनेचा उमेदवाराला कोणत्या पक्षचिन्हावर उमेदवारी मिळणार? निवडणूक आयोगाकडून त्याला मान्यता मिळणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर आता शिंदे गटाने हा निर्णय घेतल्यामुळे त्याचा भाजपला मोठा फायदा होणार आहे. तर शिवसेनेची या निवडणुकीत कोंडी करण्याचा शिंदे-फडणवीसांचा हा केविलवाणा प्रयत्न यशस्वी होणार का हे पाहाणं महात्त्वाचं ठरणार आहे.