ताज्या बातम्यादेश - विदेशमुंबईसिटी अपडेट्स

देशात पारदर्शकताच नाही, राहुल गांधी यांचा घणाघात

मुंबई | Rahul Gandhi – देशात आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता नाही. ती पाहिजे. अदानी प्रकरणी पैसे भारतातून बाहेर नेले गेले व पुन्हा भारतात आणले याची चौकशी होणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी ती केली पाहिजे, असे टीकास्त्र राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेतून मोदी यांच्यावर सोडले.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबई येथे आले असून, त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना हात घातला. मोदींचा फक्त अदानींनाच पाठिंबा का आहे याचे उत्तरही त्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी करून गांधी पुढे म्हणाले, अदानींनीच शेअरच्या किमती वाढवल्या. तेच धारावी, विमानतळ काहीही विकत घेऊ शकतात.

अदानीच एक बिलियन डॉलर भारताबाहेर नेऊ शकतात व पुन्हा भारतात आणू शकतात. अदानींच्या गुंतवणुकीचा हा पैसा आला कुठून? अशा प्रश्नांची सरबत्ती करत अदानी यांच्या या सर्व व्यवहारांची ईडी, सीबीआय अशा तपासी यंत्रणांकडून चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही केली.

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) ची तिसरी बैठक मुंबईत सुरू होत आहे. ही बैठक दोन दिवस (31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर) चालेल. या बैठकीला 28 पक्षांचे सुमारे 63 नेते आणि 6 मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच, समन्वयकाचीही घोषणा होऊ शकते. बैठकीत जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष, कुठून, किती जागांवर निवडणूक लढवणार (सीट वाटप) हे ठरवणे सर्वात आव्हानात्मक असणार आहे. कारण आघीडीतील पक्ष अनेक राज्यांत एकमेकांच्या विरोधात आहेत. विरोधकांच्या मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) ची तिसरी बैठक मुंबईत सुरू होत आहे. ही बैठक दोन दिवस (३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर) चालेल. या बैठकीला २८ पक्षांचे सुमारे ६३ नेते आणि ६ मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच, समन्वयकाचीही घोषणा होऊ शकते. बैठकीत जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष, कुठून, किती जागांवर निवडणूक लढवणार (सीट वाटप) हे ठरवणे सर्वात आव्हानात्मक असणार आहे. कारण आघीडीतील पक्ष अनेक राज्यांत एकमेकांच्या विरोधात आहेत. विरोधकांच्या मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान हल्लाबोल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये