ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी
शिवसेनेला भगदाड पाडणाऱ्या एकनाथ शिंदेंचं खातं कोणाकडे देण्यात आलं?, जाणून घ्या!

मुंबई – राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला भगदाड पाडणाऱ्या एकनाथ शिंदेंकडे अपक्षांसह 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. मात्र बंडखोरीमध्ये आमदारांमध्ये मंत्रिमंडळाती मंत्रीपदे असणाऱ्या आमदारांचाही समावेश आहे. मात्र आता उद्धव ठाकरे यांनीही यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नगरविकास खातं काढून घेतलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचे पुत्र आणि निवडून आलेल्या शिवसेना आमदारांपैकी सध्या शिवसेनेसोबत असलेले एकमेव मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरेंकडे अधिक एक खात्याची जबाबदारी दिली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्याकडे आता तीन मंत्रीपदे झाली आहेत. कारण उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खातेही त्यांना देण्यात आलंं आहे.