पुण्यातील शिवसेनेचा वजीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सैनिक म्हणून प्रमोद (नाना) भानगिरे हे सध्या पुणे शहराच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. कात्रज, मोहम्मदवाडी, कौसरबाग येथील प्रभागांचा एक नेता म्हणून त्यांनी आपली कारकीर्द पुण्याच्या महापालिकेमध्ये गाजवली. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व अशा त्रिवेणी संगमाचे प्रतीक म्हणून प्रमोद भानगिरे यांचे नाव घेतले जाते. भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पुण्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचा (शिवसेना) ठसा उमटवण्याचे मोठे आव्हान सध्या त्यांच्यासमोर आहे.
पुण्याची जबाबदारी : खरंतर पुणे हा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वानेच खऱ्या अर्थाने पुण्याला मोठ्या प्रमाणामध्ये घडविले आणि विकासामध्ये मोठा हातभार लावला. हळूहळू नेत्यांचे दुर्लक्ष आणि महापालिकेतील करामती यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे कमी होऊ लागले आणि भारतीय जनता पक्षाचे अधिक लक्ष घातल्यामुळे भाजपमुळे पुणे शहर होण्याच्या प्रक्रियेला गती आली. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुण्यामध्ये लक्ष घातले आणि भाजपला एका उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले. हे करीत असताना शिवसेनेचा संपर्क किंवा पगडा तसा पुण्यामध्ये कमीच होता तरीही काही नगरसेवक आणि आमदार या पुण्याने शिवसेनेला दिले.
आता शिवसेना दुभंगल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कमी कालावधीमध्ये पुण्याचे काही दौरे केले आणि पुण्याला आपण प्राधान्य देत असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. तेसुद्धा गडगंज किंवा धनसंपत्ती सांभाळून केवळ मंत्र्यांच्या मागेपुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांचा दिमाग मिळवण्यापेक्षा शिंदे यांनी प्रमोद नाना भानगिरे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला येथील अध्यक्षपद दिले आणि तिथूनच त्यांनी सर्वसामान्य पुणेकरांकडे आपण प्राधान्याने बघत असल्याची एक नवी संकल्पना सूचित केली.
काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय : प्रमोद नाना भानगिरे ज्या पक्षात किंवा ज्या नेतृत्वाच्या आधाराने राहतात, तेथे आपले तन मन धन आणि निष्ठा अर्पण करतात हे अनेकदा दिसून आले आहे.
सेवेचा जागर : कुठल्याही पक्षापेक्षा किंवा नेतृत्वापेक्षा प्रमोद नाना भानगिरे हे आपल्या कर्तृत्वाने मोठ्या प्रमाणात गाजत असलेले दिसून आले .हे कार्य करतो तो करत असताना त्यांनी दुर्बल घटकांची मदत आणि अनेक नवनवीन उपक्रम करण्यावर प्राधान्य दिला. महापालिकेतील आयुक्तांनी महापौर पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून प्रभागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचे काम त्यांनी केले आणि या विकास कामांतून त्यांचे नेतृत्व उभे राहिले.
रस्ते, पाण्यासाठी सर्वस्व झोकले : आपल्या प्रभागातील नवीन रस्त्यांची बांधणी करून नवे पर्यायी रस्ते उपलब्ध करण्यासंदर्भात त्यांनी मोठे काम केले. मोहम्मदवाडीमध्ये पालिकेचा दवाखाना सुरू केला. आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ओढ्या-नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले. कोरोना काळातही रात्रंदिवस बेड मिळवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड या प्रभागातील लोकांनी पाहिली आहे. स्वतः रात्री उठून उपचारासाठी मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभावदेखील लोकांनी पाहिला आहे.
अनाथ मातांना दिलासा: अनाथ मातांना पाचशे रुपये पेन्शन स्वरूपात सुरू करून त्यांनी आपले वात्सल्य मन दाखवले. शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी हक्काने पालक आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात सदैव पुढे केला. तसेच जून महिना सुरू झाला की, अभ्यासिकांना आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याची एक नवी मोहीमच त्यांनी सुरू केली. गेल्या पंधरा वर्षांत नगरसेवक म्हणून काम करीत असताना चाकोरीच्या बाहेर जाऊन प्रत्येकाला दिलासा देण्याचे काम त्यांनी केले.