‘तळपता सुर्य’ चिन्हासाठी शिंदे गट आग्रही! निवडणूक आयोगाने नाकारण्याचे सांगितले कारण!

मुंबई : (Election Commission reasons for rejecting Shinde Group party symbol) निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिलेलं आहे. परंतु ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह मिळावे म्हणून शिंदे गट आग्रही होता. मात्र कारण देत चिन्ह रद्द ठरवण्यात आलंय. ते रद्द करण्याचे महत्त्वाचं कारण आयोगाने स्पष्टीकरणासह दिलेलं आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरम देण्यात आलं आहे की, उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. आणि तसंही उगवता सूर्य हे चिन्ह डीएमके पक्षाचं आहे. याबरोबरच दाखल केलेलं सूर्याचं चिन्ह फळांशी मिळतं-जुळतं असल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आयोगाकडून हे चिन्ह रद्द केल्याचे सांगण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे गटाला सोमवारी रात्री ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं. तर उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं असून ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं. शिंदे गटाने दाखल केलेली तिनही चिन्हं काल आयोगाने नाकारली होती. मंगळवारी सकाळी निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने पुन्हा नव्याने चिन्हं दाखल केली होती. त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे.