‘या’ कारणामुळे शिवसेना-शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम!
मुंबई : (Election Commission ultimatum Shivsena-Shinde group) निवडणूक आयोगाने देशाभरातील सहा राज्यातील सात निधानसभा पोटनिवडणूकीच्या सोमवार दि. 03 रोजी पत्रक जाहिर केलं. यामुळे राज्यातील शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद पुन्हा एकदा यानिमित्ताने पुढे आला. शिवसेना पक्षाचे नाव धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या पार्श्वभुमीवर शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धनुष्यबाण कोणाचा? याबाबत निवडणूक आयोग लवकर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक आयोगानं त्यासंबंधित सर्व कागदपत्र सादर करण्यास सांगितलं आहे.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षामुळे पक्षचिन्ह धनुष्यबाण दोन्ही गटाला गमवावं लागण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे खरी शिवसेना कोणाची, याबाबत कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळं निर्णय काय येतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.