राष्ट्रसंचार कनेक्ट

केंदुर परिसरात विद्युत मोटारी चोरणारे जेरबंद

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर : केंदूर ता. शिरुर सह परिसरात विद्युत मोटारी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना या चोरट्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले होते. शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने विद्युत मोटारी चोरणाऱ्यांना जेरबंद करत आरोपींकडून सहा विद्युत मोटार व केबल जप्त करत अक्षय उर्फ बंट्या सुनील थिटे, आदेश सुनील थिटे, सुरज उर्फ मुकेश संतोष सुपेकर यांना अटक केली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील केंदूर परिसरात विहिरींवरील विद्युत मोटारींच्या चोऱ्यांचे प्रमाणवाढत असताना शेतकरी देखील हवालदिल झालेले असताना विद्युत मोटारी चोरीचे काही गुन्हे दाखल झालेले असताना केंदूर येथील पिंपळ खोरी येथे सुनिल थिटे यांच्या गोठ्यावर चोरीच्या विद्युत मोटारी ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या आदेशानुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पाबळ औट पोस्टचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, अनिल ढेकणे, पोलीस नाईक गणेश सुतार, पोलीस शिपाई विशाल देशमुख, राहुल वाघमोडे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता तेथे तीन विद्युत मोटार मिळून आल्या, पोलिसांनी मोटारीसह संशयित अक्षय उर्फ बंटया सुनिल थिटे व आदेश सुनिल थिटे या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या काही साथीदारांच्या मदतीने परिसरात विद्युत मोटार व केबल चोरी केल्याचे कबुल केले, त्यांनतर पोलिसांनी सुरज उर्फ मुकेष संतोश सुपेकर याला देखील ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देखील काही विद्युत मोटार मिळून आल्या.

दरम्यान तिघांनी देखील त्यांच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने विद्युत मोटारी चोरल्याचे कबुल केले असून पोलिसांच्या पथकाने तिघांकडून चोरीच्या सहा विद्युत मोटार, केबल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या असून यावेळी पोलिसांनी अक्षय उर्फ बंट्या सुनील थिटे वय २३ वर्षे, आदेश सुनील थिटे वय २१ वर्षे व सुरज उर्फ मुकेश संतोष सुपेकर वय २१ वर्षे तिघे रा. थिटे आळी केंदूर ता. शिरुर जि. पुणे यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये