न्युट्रीशियनफिचरराष्ट्रसंचार कनेक्ट

चमकदार दाट केसांसाठी आहारातील रहस्य…

-जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

चमकदार आणि दाट केसांच रहस्य निरोगी शरीर असते. केसांचेआरोग्य चांगले राखण्यासाठी पोषक तत्वांनी भरलेला आहार नक्कीच फायदेशीर ठरतो .सततच्या प्रदूषणयुक्त हवेतील वावर, केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा केसांवर केलेला अतिरेक, आहारातल्या चुकीच्या पद्धती यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. आहारात खालील पदार्थांचा समावेश करून केस गळणे, कोंडा यापासून आराम मिळू शकतो .सुंदर ,चमकदार ,दाट केसांसाठी आहारात प्रोटिन्स, ओमेगा-3 व बायोटिन युक्त पदार्थांचा समावेश करावा.

– बोर, आवळा, स्ट्रॉबेरी ,संत्री, मोसंबी :या फळांमध्ये भरपूर प्रमाणात ‘ क ‘ जीवनसत्व असते. आहारात लोह शोषून घेण्यास क जीवनसत्व मदत करतात. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो व केस गळणे वाढू शकते म्हणून क जीवनसत्व असणारी फळे रोजच्या आहारात असावी .

– हिरव्या पालेभाज्या: हिरव्या पालेभाज्यांमध्ये’ अ’ जीवनसत्व व ‘क’ जीवनसत्व तसेच लोह मुबलक प्रमाणात असते केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरते.’ अ’ जीवनसत्त्वामुळे डोक्याच्या त्वचेवरील आद्र्रता टिकून राहते. केसांमधील रुक्षपणा नाहीसा होतो .

– रताळी, गाजर, बीट :यामध्ये बीटाकेरेटिन असते .याचे रूपांतर शरीरात ‘अ’जीवनसत्त्वात होते. अ जीवनसत्त्व सीबमच्या(सीबम म्हणजे शरीरात आढळणारे नैसर्गिक तेल ) वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे डोक्याची त्वचा निरोगी राहते, कोंडा होत नाही ,केस वाढून दाट होतात .

– अवेकाडो: पेरू सारखे लागणारे हे फळ शरीरास उपयुक्त उपयुक्त असणाऱ्या फॅटचे उत्तम स्त्रोत आहे तसेच यामध्ये विटामिन ‘इ ‘, झिंक मुबलक प्रमाणात असतात यामुळे केसांची गळती थांबून केस दाट होतात.अवेकाडो पासून चटणी,सलेड, पराठे बनवता येतील.

– सुकामेवा :यामध्ये विटामीन ‘ इ’ विटामीन’ बी ‘ असल्याने केसांचे आरोग्य सुधारते .

– बिया :सूर्यफूल बिया,लाल भोपळ्याच्या बिया ,भाजलेले जवस ,काळे व पांढरे तीळ यामधे भरपूर प्रमाणात जीवनसत्व ,झिंक ,सेलेनियम मिळते .शाकाहारी व्यक्तींना वनस्पतिजन्य omega-3 चा उत्तम स्त्रोत असतो.केसांचेआरोग्य उत्तम राखण्यास वरील बिया वरदान ठरतात.

– कडधान्य :यामधून प्रोटीन, झिंक भरपूर प्रमाणात मिळते मोड आलेली कडधान्ये पचण्यास हलकी असतात यामध्ये लोह बायोटिन ,फोलेट सारखे पोषक घटक मिळतात त्यामुळे केसांचे आरोग्य उत्तम राहते

– सोयाबीन: सोयाबीनचा आहारात समावेश केल्यास केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या मजबुतीसाठी चांगला फायदा होतो यामध्ये स्पेअरमीडाईन नावाचा घटक असतो जो केसांची वाढ दीर्घकाळ करण्यास मदत करतो

– अंडी व सी फुड्स :प्रथिनांचे प्रमाण यामध्ये मुबलक असते. केस गळती थांबून केस चमकदार बनवतात ,केसांचे फॉलिकल्स प्रोटीनने बनलेले असतात म्हणून प्रोटीन युक्त आहार केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये