मोड आलेले हिरवे मुग ठेवतील तुम्हाला ‘या’ भयंकर आजारांपासून दूर!
Benefits of Mung Beans : तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की आपण जे हिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात. चला तर जाणून घेऊया कधीही न ऐकलेल्या ना वाचलेल्या मोड आलेल्या हिरव्या मुगांच्या फायद्यांबद्दल!
हृदय रोगांपासून सुरक्षा : ज्या कोणाला हृदयाचे आजार आहेत व तशी काही समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात नियमितपणे मोड आलेल्या मुगांचे सेवन करावे.
मधुमेह नियंत्रणात येतो : मोड आलेल्या मुग डाळीचे सेवन मधुमेहाच्या रूग्णासाठी मधुमेहावरील एखाद्या औषधासारखे काम करते. मधुमेहापासून होणाऱ्या धोक्यांपासून आपल्या शरीराचा बचाव करता यावा यासाठी मोड आलेल्या मुगांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म असतो.
फोलेटचा चांगला स्त्रोत : गरोदर स्त्रियांना गरोदरपणात फोलेट नावाच्या एका पोषक तत्वाची मोठी गरज भासते. अशावेळी मोड आलेले मुग उपयुक्त ठरू शकतात. मुग हा फोलेटचा उत्तम स्त्रोत मानला जातो.
प्रजनन क्षमता सक्षम होते : मोड आलेल्या मुगांमध्ये प्रजनन क्षमता अधिक उत्तम आणि सक्षम बनवणारे गुणधर्म आणि तत्व आढळतात. हे मुग शरीराला उर्जावान बनवतात आणि याच्या सेवनाने लैंगिक हार्मोन्स सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार होतात. म्हणून प्रजनन क्षमता संतुलित राखण्यासाठी मोड आलेल्या मुगांचे सेवन आवर्जुन करावे.
वजन कमी करण्यासाठी : वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते.