‘आधीच माकड, त्यात बेवडा प्यायल्यासारखा बोलतो…’; छगन भुजबळांचा जरांगेंवर बोचरा वार
मुंबई : (Chhagan Bhujbal On Manoj Jarange) मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथे ओबीसी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नसल्याचा पुनर्उच्चार केला. तसेच मी आयुष्यात कधी आरक्षणाचा लाभ घेतला नाही. माझ्या मुलांनी कधी लाभ घेतला नाही. पुढेही मी कधीही आरक्षणाचा लाभ घेणार नाही, असं ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीत घेऊन इतर जातींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारने जे आर्थिक मागासांना १० टक्के आरक्षण दिलं, त्यातील ८५ टक्के जागांचा लाभ मराठ्यांनी घेतला आहे. सारथीला मोठ्या प्रमाणात मदत केली जातीये, पण ओबीसींना मदत केली जात नाहीये. हा भेदभाव मंजूर नाही. धनगर समाजाला योजनेची मदत जाहीर करुन अद्याप मदत मिळालेली नाही. त्यांना जे देताय ते आम्हालाही द्या हीच आमची मागणी आहे, असं भुजबळ म्हणाले.
भुजबळांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका केली. जरांगे काहीही बोलतो. आमची लायकी काढतो. एक म्हण आहे. आधीच मर्कट आणि त्याच्यात मद्य प्याला. काहीही बोलतोय. आमची लायकी काढणारा तू कोण, अशी घणाघाती टीका भुजबळांनी केली. मनोज जरांगे पाटील सासरची भाकरी खातात, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.
जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मराठा समाज म्हणून लिहिला जात नाही, तर मावळे घेऊन ते लढले असा लिहिला जातो. त्याच्यामध्ये सर्वजण होते. सर्व जातीजमातीचे लोक होते, असं भुजबळ म्हणाले. काही विशिष्ठ लोकांना गावबंदी होत आहे.