ताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बाॅस 16’मधून सलमान खानची एक्झिट? ‘हा’ सेलिब्रिटी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई | Salman Khan – ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) हे पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. तसंच बिग बाॅस हा कार्यक्रम बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) नावानं ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून सलमान खान बिग बाॅसचं सूत्रसंचालन करत आहे. मात्र, आता सलमान या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘बिग बॉस 16’च्या खबरीनं दिलेल्या माहितीनुसार, आता सलमान खान बिग बॉस 16 चं सूत्रसंचालन करणार नाहीये. तसंच सलमान वीकेंडच्या वारमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पण महाअंतिम सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सलमान खान सांभाळणार आहे.

या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा आता करण जोहर (Karan Johar) सांभाळणार आहे. याआधीही करण ‘बिग बॉस ओटीटी’चं (Bigg Boss OTT) सूत्रसंचालन करताना दिसला होता. तसंच ‘बिग बॉस 16’च्या सुरुवातीला सलमानची प्रकृती बिघडल्यानं करणनं सूत्रसंचालन केलं होतं.

दरम्यान, या आठवड्यात बिग बाॅसच्या घरातून अब्दू रोजिक (Abdu Rozik) आणि श्रीजिता डे (Sreejita de) बाहेर पडले होते. पुढील प्रोजेक्टसाठी अब्दूनं हा कार्यक्रम सोडला आहे. तर आता साजिद खानदेखील (Sajid Khan) आगामी प्रोजेक्टसाठी हा कार्यक्रम सोडणार असल्याची चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/CnWscNKIlw_/?utm_source=ig_web_copy_link

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये