ताज्या बातम्यामनोरंजन

नोरा फतेहीने ‘सात समंदर पार’ गाण्यावर केली चक्क लावणी; व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | Nora Fatehi Dance Video Viral | बॅालिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actor) नोरी फतेही (Nora Fatehi) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच नोरा फतेही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच तिचे चाहते देखील लाखोंच्या संख्येत आहेत. त्याचबरोबर नोरा फतेहीला आघाडीची डान्सर म्हणून ओळखले जाते. नुकतंच नोराचा एक डान्स व्हिडीओ (Dance Video) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नोराने चक्क लावणी (Lawani) केली आहे. Nora Fatehi Dance Video Viral

सध्या नोरा फतेही ही डान्स दिवाने जूनियर (Dance Deewane Juniors) या शोचे परिक्षक म्हणून काम करत आहे. यावेळी नोराने स्वत:चा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नोरा ही ‘सात समंदर पार’ (Sat Samndar Par) या गाण्यावर लावणी करताना दिसत आहे. यात ती गीत कौर बग्गा (Geeta Kaur Bagga) आणि कॅप्टन सोनाली कार (Sonali kar) यांच्यासोबत स्टेजवर लावणी करताना दिसत आहे.

नोरा फतेहीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाचा क्रॅाप टॅाप आणि स्कर्ट परिधान केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने म्हटलं आहे की, “माझ्या ज्युनियर्ससोबत स्टेजवर डान्स करताना खूप मजा आली. यावेळी मी लावणीचा प्रयत्न केला. सोनाली आणि गीत या दोघीही अप्रतिम डान्सर आहेत. या व्हिडीओच्या मागेच तुम्ही जी कमेंट्री ऐकत आहात, ती देखील मला फार आवडली.” तसंच नोराच्या या डान्स व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती देखील दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये