हरमनप्रीत कौरचे धमाकेदार शतक; 23 वर्षांनी इंग्लंडमध्ये ODI मालिका जिंकत, चारली पराभवाची धुळ!

(England Vs India Woman Cricket Team Win 2nd ODI) भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळल्या जात असलेल्या, भारत आणि इंग्लंड याच्यातील दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात भारतीय संघानं इंग्लडचा 88 धावांनी पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय महिला संघाने तीन एकदिवशीय सामन्यात 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे.
दरम्यान, इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने 50 षटकांत 5 बाद 334 धावांचे लक्ष इंग्लंड संघासमोर ठेवले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुले आवघ्या 44.2 षटकांत 245 धावांवर संपुर्ण संघ बाद झाला.
शेफाली वर्मा 7 चेंडूत 8 धावा, स्मृती मंधाना 51 चेंडूत 40 धावा, यास्तिका भाटिया 34 चेंडूत 26 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौर 111 चेंडूत चार षटकार आणि 18 चौकरांसह 143 धावा , हरलीन देओल 72 चेंडूत 58 धावा, पूजा वस्त्रकार 16 चेंडूत 18 धावा, दीप्ती शर्मा 9 चेंडूत 15 धावा करत भारतीय संघानं इंग्लंडला तब्बल 334 धावांचे लक्ष दिलं होत.