प्रसिद्ध अभिनेत्रीची इन्स्टाग्राम लाईव्हनंतर आत्महत्या; हॉटेलमध्ये पंख्याला लटकलेला दिसला मृतदेह
वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Bhojpuri Actress Akanksha Dubey Suicide in Varanasi) रविवारी वाराणसीतील सारनाथ (Varanasi news, Sarnath) येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती आहे. हॉटेलमधील रुम क्रमांक 105 मध्ये त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. आकांक्षाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आकांक्षा ही भदोही (Bhadohi) जिल्ह्यातील चौरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारसीपूर गावची रहिवासी होती. शुक्रवारी रात्री शूटिंग आटोपून ती हॉटेलमध्ये गेली होती आणि सकाळी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. (Bhojpuri Actress Akanksha Dubey Suicide in Varanasi)
रविवारी सकाळी मेकअप मॅनने आकांक्षा दुबेला (Akanksha Dubey) फोन केला. फोन न उचलल्याने तिचा मेकअपमन हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे आकांक्षाच्या खोलीचा दरवाजा बंद होता. ‘आकांक्षाने सकाळपासून नाश्ता ऑर्डर केला नाही’ अशी माहिती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मेकअपमनला दिली. यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले.
पोलिसांच्या उपस्थितीत मॅनेजरने मास्टर चावीने दरवाजा उघडला असता आकांक्षा हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एसीपी सारनाथ यांनी त्याचा मोबाईल आणि इतर सामान ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पुढील तपास सुरु असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
आत्महत्या पूर्वी आकांक्षाने केले होते इन्स्टाग्राम लाईव्ह
आत्महत्येपूर्वी आकांक्षा इंस्टाग्राम लाईव्हवर ढसाढसा रडताना दिसली होती. सध्या व्हिडिओ डिलीट करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय रात्री उशिरा तिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तिने ‘हिलोर मारे’ (Hilor Mare) या भोजपुरी गाण्यावर आरशासमोर बेली डान्स केला होता.
आत्महत्येनंतर काही तासांनी आकांक्षाचे शेवटचे भोजपुरी गाणे रिलीज झाले. ‘ये आरा कभी हरा नहीं’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. या गाण्याचा व्हिडिओ भोजपुरी कलाकार पवन सिंग आणि आकांक्षा यांच्यावर शूट करण्यात आला आहे. गाण्याचे बोल जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि इमामुद्दीन यांचे असून संगीत प्रियांशू सिंग यांनी दिले आहे.