“बाथरुममधून बाहेर पडेपर्यंतही…”, शाहिद कपूरनं पत्नी मीरा राजपूतची उडवली खिल्ली

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते दोघंही नेहमी एकमेकांसोबतचे व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट देखील करताना दिसतात. त्यांचं हे बॉन्डिंग पाहून चाहतेही खुश होतात. पण अनेकदा हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली देखील उडवताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. मीरा राजपूतनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट करत शाहिदनं तिची खिल्ली उडवली आहे.
मीरा राजपूतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये मीरानं मेकअप केलेला दिसत आहे. मीरानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय की तिला या गोष्टीचा अभिमान वाटतो की, तिला जसा मेकअप करायचा होता तसा ती करू शकली. आपल्या या मेकअपचं सीक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. आपला फोटो शेअर करताना तिने लिहिलं, “नो फिल्टर मेकअप माझ्याकडून, अनेक वर्षांनंतर मी माझे मेकअप प्रॉडक्ट बदलले. मी यांच्या प्रेमात आहेत. तुम्ही सांगा तुम्हाला कसे वाटले.”
मीराच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पण अभिनेता शाहिद कपूरनं मात्र आपल्या पत्नीलाच सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. शाहिद कपूरनं मीराच्या पोस्टवर कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. त्याने लिहिलं, “ती एवढी खुश होती की, तिला बाथरुममधून बाहेर पडेपर्यंतही वाट पाहता आली नाही.” शाहिदच्या या कमेंटला मीराने रिप्लाय दिला आहे. तिने लिहिलं, “तुला हा मेसेज इनबॉक्समध्ये करायचा होता का? जो तू इथे कमेंटमध्ये चुकून पोस्ट केला आहेस.” आपल्या या कमेंटमध्ये तिने शाहिदचा भाऊ इशान खट्टरला देखील टॅग केलं आहे.