राॅकी ‘त्या’ 4 वर्षांमध्ये कुठे होता? ‘KGF 3’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मुंबई | ‘KGF 3’ Teaser – गेल्या वर्षी ‘KGF 2’ (KGF 2) ने रेकाॅर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तसंच या चित्रपटाचा तिसरा भाग कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. तर आता ‘केजीएफ 3’ (KGF 3) चा धमाकेदार टीझर (Teaser) नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच हा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘केजीएफ 2’ हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. तर काल (14 एप्रिल) या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्तानं या चित्रपटाच्या टीमनं एक खास टीझर शेअर केला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून ‘केजीएफ 3’ बाबत त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
काल प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे केजीएफ चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कथा एक वेगळंच वळण घेणार असल्याचं दिसतंय. राॅकी 1978 ते 1981 या चार वर्षांच्या कालावधीत कुठे होता? याबाबतच रहस्य ‘केजीएफ 3’ मधून उलगडणार आहे, असं या टीझरमधून समजतंय. तसंच हा टीझर पोस्ट करत निर्मात्यांनी लिहिलं आहे की, “सर्वात शक्तिशाली माणसानं पाळलेलं शक्तिशाली वचन..”
दरम्यान, ‘केजीएफ 3’ चा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या टीझरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. तसंच लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.