महाराष्ट्ररणधुमाळी
फेसबुक पोस्टवरून भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

मुंबई : भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आहे. विनायक आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात केली होती.
नुकतंच टीव्ही अभिनेत्री केतकी हिने केलेल्या शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याने सर्व क्षेत्रातील लोकांकडून विरोध केला जात आहे. तिच्यावर गुन्हा देखील दाखल झाला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.