“नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण…”; निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा!

मुंबई – Neelesh Rane on Supriya Sule | देहूमधील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने मोठा वाद रंगला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलताना, अजित पवारांना भाषण करू न देणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलायला संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाचे कौतुक करणं त्यांना सुचलं नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
दरम्यान, खासदार सुळे टीव्हीवरील फुटेज बघा. हजारो वारकरी या कार्यक्रमाला आले होते. त्या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम तुम्ही केलं असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे.