ताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

मुंबई | Vijay Raghavendra – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्र (Vijay Raghavendra) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना राघवेंद्रचं (Spandana Raghavendra) निधन झालं आहे. स्पंदना ही कुटुंबासह परदेशात फिरायला गेली असताना तिथे तिचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पंदना आज (7 ऑगस्ट) भारतात परतणार होती. तसंच ती भारतात आल्यानंतर एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होणार होती. पण त्याआधीच स्पंदनाचा रक्तदाब कमी झाला आणि त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्पंदनाच्या निधनाची माहिती विजय राघवेंद्रचा भाऊ मुरली यांनी दिली आहे. स्पंदना ही कुटुंबासोबत थायलंडमध्ये फिरायला गेली होती. तिथे ती नेहमीप्रमाणे झोपली पण नंतर उठली नाही. आता माझा भाऊ बँकॉकमध्ये असून आम्ही त्यांच्याकडून काही माहिती येते का याची वाट पाहत आहोत, अशी माहिती मुरली यांनी दिली. तर आता स्पंदनाचे कुटुंबीय तिच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये