प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉयची कोट्यावधींची फसवणूक, पोलिसांकडून एकाला अटक
Vivek Oberoi | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉयला (Vivek Oberoi) मोठा धक्का बसला आहे. विवेक ओबेरॉयची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे. त्याची तब्बल 1.55 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर विवेकची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
संजय शहा असं विवेक ओबेरॉयची फसवणूक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तसंच विवेकची 1.55 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा आरोप होता. त्यामुळे जुलै महिन्यात तीन जणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
आरोपींनी विवेक ओबेरॉयला सिनेनिर्मितीसाठी पैसे गुंतवायला लावले होते. नंतर आरोपींनी ते पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.