प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआय कडून अटक
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले याना सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले याना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत ईडीने देखील जून २०२१ मध्ये भोसले यांना फेमा कायद्याअंतर्गत नोटीस बजावून त्यांची चौकशी कीहल ४० कोटींची संपत्तीची जप्त केली होती. अविनाश भोसलेंनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीबाबत ही चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीबीआयने देखील भोसलेंच्या निवासस्थानी आणि इतर परिसरात छापेमारी केली होती. त्याची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत जे काही व्यवहार झाले होते ते व्यवहार संशयास्पद होते असे सीबीआयने म्हंटले होते. अविनाश भोसले आणि त्यांचे जे व्यावसायिक भागीदार आहेत त्यांच्या देखील घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने छापे मारले होते. भोसले यांच्यासोबत अजून कितीजणांवर डीएचएफएल प्रकरणात कारवाई होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. अविनाश भोसले हे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.