ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला किती दिवस बरोबर ठेवायचं अन्…”, भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

मुंबई : (Jaykumar More On Eknath Shinde And Ajit Pawar) शिवसेनेचे बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत एका वर्षापुर्वी नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीशी बंडखोरी करून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपुर्वी सरकारच्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहिर झाला. यामध्ये नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार गटाला काही महत्त्वाची खाते देण्यात आल्यामुळे भाजप-शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता भाजपच्या एका आमदाराने केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकाणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात भारतीय जनता पार्टीची महत्ताची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थि होते. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना जयकुमार गोरे म्हणाले, राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवसीच आहेत. आपल्या नेतृत्त्वाला माहित आहे की, कोणाला बरोबर घ्याचं आणि कोणाला कधी सोडायचं? त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गट आणि अजित पवार गट सावध भुमिकेत आहे.

पुढे बोलताना गोरे म्हणाले, आपल्या भारतीय जनता पार्टीने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्त्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठोवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? हे सगळं आपल्या नेतृत्त्वाला माहिती आहे. असंच या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसचं आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये