ताज्या बातम्यामनोरंजन

‘फर्स्ट सेकंड चांस’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; रेणुका शहाणे दिसणार रोमँटिक अंदाजात

मुंबई : नुकतंच ‘फर्स्ट सेकंड चांस’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटात अभिनेत्री रेणुका शहाणे रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. तसंच रेणुका शहाणे आणि अनंथ महादेवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर फर्स्ट सेकंड चांस या चित्रपटाचं पोस्टर चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. 

‘फर्स्ट सेकंड चांस’ चित्रपटाच्या पोस्टरमधून हा सिनेमा प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा करून देईल याचा अंदाज येतो. या चित्रपटात अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी तसेच साहिल उप्पल आणि निखिल संघदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक लक्ष्मी आर अय्यरने केलं आहे. तसंच या चित्रपटातील गाणी आनंद भास्कर आणि हंसिका अय्यर यांनी गायली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये