दिल दोस्ती दुनियादारी ते फ्रेशर्स; मैत्रीवर आधारित ‘या’ मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली
Friendship Day 2023 : मैत्री म्हणजे विश्वास आणि आपुलकीचं नातं (Friendship Day 2023). मैत्री या नात्यावर अनेक कवींनी कविता केल्या आहेत. तसेच मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट देखील तुम्ही पाहिले असतील. मागील काळात मैत्रीच्या नात्यावर मराठी मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत अन् त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत.
दिल दोस्ती दुनियादारी (Dil Dosti Duniyadari)
दिल दोस्ती दुनियादारी मैत्रीमुळे ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मैत्रीच्या नात्यावर अभुतपुर्वी असे काम करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर या मालिकेने राज्य केल्याचे दिसून आलं.
फुलपाखरू (Phulpakharu)
फुलपाखरू मानस आणि वैदेहीच्या कॉलेज गँगसोबतच्या मैत्रीवर आधारित होता. कॉलेजचे लेक्चर्स न करता इतर गोष्टी केल्याचे दाखवण्यात आलं आहे. तसेच कॉलेज पिकनिक हे सर्व या मालिकेत दाखवण्यात आले होते.
फ्रेशर्स (Freshers)
कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा प्रवास एकत्र सुरू करणाऱ्या सात मित्रांची ही कथा फ्रेशर्स या मालिकेत दाखवण्यात आली होती. या मालिकेत मिताली मयेकर, अमृता देशमुख या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
दे धमाल (De Dhamal)
2000 च्या सुरुवातीला दे धमाल ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत बालपणीच्या मैत्रीचे किस्से दाखवण्यात आले. या मालिकेत या सर्व कलाकारांनी बालकलाकार म्हणून काम केले.