रेशनिंग दुकानात मिळणार फळे-भाजीपाला; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
मुंबई : आज राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्या निर्णयामुळे शेतकर्यांना नवी बाजारपेठ खुली होणार आहे. तर गेल्या काही वर्षात राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने विविध उत्पादने रेशनवाटप दुकानामधून विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. कारण रेशन वाटप दुकानदारांचे उत्पन्न वाढले पाहिजे. याच पार्श्वभूमीवर शिधावाटप दुकानांमधून फळे आणि भाजीपाला मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
आतापर्यंत केंद्र तसेच राज्य शासनाकडून रास्त भाव दुकानदारांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि दुकानदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तर आता शिधावाटप दुकानदाराला विविध वस्तू,फळे, भाजीपाला विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी वितरण प्रयोगिक तत्वावर देण्यात आली असून शेतकरी प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधावाटप दुकानदाराकडून शेतकर्यांनी उत्पादन केलेल्य भाजीपाला,फळे विक्रीसाठी देण्यात आलं आहे.
तसचं लवकरच शिधावाटप केंद्रातून भाजीपाला आणि फळेही मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. या भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी सहा महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली आहे. यामध्ये कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी, पुणे या शेतकरी उत्पादक कंपनीस पुणे जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्त भाव दुकानांमधून देण्यात येणार आहे.शिधा वाटप कमी कमी होत असल्याने आणि वाढती महागाई यामुळे दुकानदारांना कमिशन वाढवून मिळाल पाहिजे. अशी अनेक वर्षांची दुकानदारांची मागणी होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे.