पुण्यातील ‘त्या’ किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी घातल्याने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गडप्रेमींमध्ये संताप

पुणे | जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर राज्य संरक्षित स्मारक परिसरात पर्यटकांना रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी केली आहे. या बंदीच्या आदेशानुसार राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या क्षेत्रात पर्यटकांना तसेच कोणत्याही व्यक्तीस रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी करण्यात आली आहे. या आदेशाची प्रत स्मारकाच्या दर्शनी भागावर फलकावर लावण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर सह्याद्री ट्रेकर्सने निषेध व्यक्त केला आहे.
तुमचे शासकीय नियम आहेत म्हणून हा आदेश काढला पण असेल तुम्ही, पण असे किती शासकीय नियम तुम्ही किल्ल्यांच्या बाबतीत पळता. काल परवाच राजगड केलेल्या चुकीच्या कामामुळे खूप मोठं रामायण झालं आहे. त्याचा तर बदला नाही ना घेत तुम्ही. आता तुम्ही कसल्या काळजी पोटी गड मुक्कामास बंद करणार आहात ? राजगड अभ्यासपूर्वक पाहणाऱ्या कोणत्याही गडप्रेमीस विचारा गड एका दिवसात पाहून होतो का? आता ज्यांना गड अभ्यासायचा आहे त्यांना रोज गडावरून खाली जाऊन वरती यायचं का ? असा सवालही गडकिल्ले प्रेमींनी केला आहे.
