“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 20 आमदारांसह अभिजीत बिचुकलेंच्या संपर्कात”
मुंबई: सध्या राज्यात विधान परिषद निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र आता मोठं राजकीय नाट्य सुरू झालं आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही उमेदवार सूरतमध्ये पोहचले आहेत. यानंतर मनसेचे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे 20 आमदारांसह अभिजीत बिचुकलेंच्या संपर्कात, असं म्हणत गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकेचा बाण सोडला आहे. तसंच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि अमेय खोपकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड पुकारण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवसेना भवनाबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शिवसैनिकांना जमण्याचे आदेश दिल्याची माहिती असून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.