Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

जेष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी दिला NDTV इंडियाचा राजीनामा; ‘ही’ आहेत कारणे

Ravish Kumar Resigns NDTV India : देशभर लोकप्रिय असलेले जेष्ठ पत्रकार रविश कुमार (Ravish Kumar)यांनी NDTV इंडियाचा (NDTV India) राजीनामा दिला आहे. NDTV इंडियात ते वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांचा प्राईम टाईम (Prime Time With Ravish Kumar) शो देशभरात बघितला जायचा. ते सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका करत. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. मुळात NDTV वरून निष्पक्ष आणि निर्भीड (True Journalism) पत्रकारिता केली जाते असा समज देशातील लोकांचा झालेला होता. (Gautam Adani Buys NDTV India Ravish Kumar Resigns)

NDTVची मालकी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे गेल्यापासून NDTV या वृत्तसंस्थेत मोठ्या घडामोडी घडल्या. NDTVमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांवर बंधने येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी देखील नुकताच NDTVला राजीनामा दिला आहे.

NDTV चे अधिकार गौतम अदानी यांच्याकडे जाण्यामागे मोठं राजकारण असल्याची चर्चा सुरु आहे. तर अनेक प्रस्थापित वृत्तसंस्था निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता करत नसून सरकारच्या चुकीच्या धोरणांना खतपाणी घालतात अशी चर्चा लोक समाजमाध्यमांवर करत आहेत.

NDTVचे अधिकार अदानी यांच्याकडे गेल्यापासूनच लोकांमध्ये रविश कुमार हे राजीनामा देतील अशी शंका निर्माण झालेली दिसली होती. समाजमाध्यमांवर रविश कुमार यांच्या राजीनाम्याबद्दल चर्चा देखील सुरु होत्या. शेवटी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, ते त्यांच्या युट्युब चॅनल वरून पत्रकारिता करणार असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये