‘हा’ खेळाडू होणार महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी?

नवी दिल्ली : (IPL session 2023) आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे. दरम्यान लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला (Ben stokes) तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले.
दरम्यान, स्टोक्स संघात आल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जची कमान गायकवाडकडे सोपवली जाणार की स्टोक्सकडे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या चर्चेदरम्यान, सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, ‘आम्ही स्टोक्सला खरेदी केल्यामुळे खूप आनंदी आहोत. तो सामना जिंकवणारा खेळाडू आणि एक उत्तम कर्णधार आहे. मात्र, महेंद्रसिंग धोनीनंतर सीएसकेचा कर्णधार स्टोक्स होणार का हे ठरवणं अजून बाकी आहे. परदेशी खेळाडू संघाचा कर्णधार झाला तर टीम कॉम्बिनेशनमध्ये अडचण येते. पुढच्या हंगामात स्टोक्सची साथ मिळाली नाही तर अडचण येईल. त्यामुळे ऋतुराज गायकवाड कर्णधार बनवण्याच्या शर्यतीत कायम आहे.