ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

नादच खुळा! लेकाच्या वाढदिवसादिवशी बापानं पूर्ण केली स्वत:ची हौस, थेट गौतमीचा कार्यक्रम केला आयोजित

सातारा | Gautami Patil – नृत्यांगणा गौतमी पाटीलनं (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. तिची क्रेझ सध्या सगळीकडे पहायला मिळत आहे. तसंच तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. मात्र, काही जणांनी तिच्या नृत्यावर आक्षेपही घेतला आहे. त्यामुळे गौतमी पाटील (Gautami Patil) चांगलीच चर्चेत आहे. अशातच नुकतचं साताऱ्यात एका बापानं आपल्या लेकाच्या वाढदिवसादिवशी स्वत:ची हौस पूर्ण करून घेतली आहे. एका पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी थेट गौतमीचा शो आयोजित केला होता. त्यामुळे या वाढदिवसाची सगळीकडे एकच चर्चा होती.

साताऱ्याच्या (Satara) खोजेवाडी या गावातील एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. तसंच त्याच्या वडिलांनी लेकाच्या वाढदिवसानिमित्त गावच्या पारावर थेट गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामुळे गौतमीचा (Gautami Patil) शो पाहायला गावातील मंडळींनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे या चिमुकल्याच्या वाढदिवसाला चार चाँद लागले हे म्हणणं वावगं ठरणार नाही.

खोजेवाडी गावातील चेतन शिंदे यांचा पाच वर्षांचा मुलगा मल्हारचा वाढदिवस होता. मल्हारचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी चेतन शिंदे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामुळे गावात या बड्डेबॉयची वेगळी क्रेझ पाहायला मिळाली.

साताऱ्यातील गौतमीच्या या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची चांगलीच झुंबड उडाली होती. तसंच तिच्या या कार्यक्रमाला महिलांची देखील उपस्थिती होती. मात्र, बड्डेबॉयच्या वडिलांनी गौतमीला अश्लिल नृत्य न करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे गौतमीच्या या कार्यक्रमात कोणताही राडा झाला नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये