“काही व्यक्ती तुम्हाला…”, विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिनिलीयाची भावनिक पोस्ट
मुंबई | Genelia Deshmukh – आज (26 मे) महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त जिनिलीयानं (Genelia Deshmukh) भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं विलासराव देशमुख यांचा फोटोही शेअर केला आहे. सध्या जिनिलीयाच्या या पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
जिनिलीयानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं विलासराव देशमुख यांचा एक फोटो शेअर केला असून या फोटोला तिची मुलं रिआन आणि राहील अभिवादन करताना दिसत आहेत. तसंच ही पोस्ट शेअर करत जिनिलीयानं म्हटलं आहे की, “तुम्हाला काही व्यक्ती कधीच सोडून जात नाहीत.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा.. प्रत्येक दिवशी तुम्हाला साजरं करतो.” जिनिलीयानं शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
दरम्यान, जिनिलीया ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती 2012 मध्ये अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्नबंधनात अडकली आणि देशमुख घराण्याची सून झाली. विशेष म्हणजे जिनिलीया आणि विलासराव देशमुख यांचं नातं खूपच खास होतं. त्यामुळे आज जिनिलीयानं विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.