क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

सिराज-उमेश यादवपुढे बांगलादेशाच्या फलंदाजांची शरणागती!

India Vs Bangladesh 1st Test Match 2022 2 nd Day : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या. भारताकडून चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि अश्विन यांनी अर्धशतकी खेळी खेळली.

त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशाला मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का दिला. बांगलादेशाच्या फलंदाजांनी एकदिवशीय सामन्यात दाखवलेला करिश्मा येथे काही चालला नाही. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज-3 आणि फिरकी गोलंदाज उमेश यादवने-4 फलंदाजाचा बळी घेतले. भारतील गोलंदाजांनी अशी काही जादू चालवली की, ज्यामुळे बांगलादेशाच्या फलंदाजाना शरणागती पत्कारावी लागली.

एकापाठोपाठ अशा क्रमाने बाद होण्याची वेळ फलंदाजांवर आली. त्यामुळे बांगलादेशाच्या 40 षटकांत 117 धावांच्या मोबदल्यात 8 बाद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे फिरकीसाठी अनुकूल असलेल्या मैदानावर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने देखील अशा काय धुमाकुळ घातली की, बांगलादेशाच्या फलंदाजांना चारीमुंड्या चित केलं. त्यामुळे भारतील क्रिकेटप्रेमिंच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशीपमध्ये जाण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये