फिचरराष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचर

गेट आऊट ऑफ युअर ओन वे

जेव्हा अपयशी व्यक्तीला विचारले जाते की, ‘तुझ्या यशाच्या मार्गातील अडथळा काय?’ तेव्हा तो वेळ, पैसा, लोक, परिस्थिती अशी मोठी यादी सांगतो आणि ते अडथळे पार करणे त्याला कठीण वाटत असतं. पण जर त्याला हे समजलं की, तोच त्याच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे आणि तो कसा दूर करायचा तर तो सहजतेने यश मिळवेल.

खरंतर, यश आणि आनंद मिळण्यापासून आपणच आपल्याला बर्‍याचदा दूर ठेवत असतो. आपणच आपल्या मार्गातील अडथळा बनत असतो. स्व-पराजय करणारी आपली वागणूकच याला कारणीभूत असते. ही वागणूक कशी तयार होते, याबाबत हे पुस्तक सांगतं. हे पुस्तक आपल्याला या वागणुकीच्या मुळाशी कोणत्या भावना असतात, तिथंपर्यंत घेऊन जातं. बर्‍याचदा याची मुळं आपल्या बालपणात सापडतात.

अतिशय मौल्यवान अशा या पुस्तकात स्व-पराजय करणार्‍या ४० वागणुकी सांगितल्या असून त्याच्यावर मात कशी करायची, यासाठी अतिशय प्रॅक्टिकल उपाय दिले आहेत. या पुस्तकाची रचना ही – सुरुवातीला स्व-पराजय करणारी वागणूक दिली आहे, त्यानंतर त्या वागणुकीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, ते दिले आहे व प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्व-पराजय करणार्‍या त्या वागणुकीवर मात कशी करायची, यासाठी उपाय दिले आहेत.

या पुस्तकामध्ये –
चालढकल करणं
‘नाही’ म्हणायचं असताना ‘हो’ म्हणणं
माझंच बरोबर आहे, असं मानणं
आपल्या चुकांतून न शिकणं
आततायीपणा किंवा अट्टहास करणं
मनाला फार लावून घेणं
अवास्तव अपेक्षा ठेवणं
इतरांची ईर्षा करणं
पटकन हार मानणं

या आणि अशा प्रकारच्या ४० स्व-पराजय करणार्‍या वागणुकी दिल्या आहेत आणि त्यावरील प्रॅक्टिकल उपायही दिले आहेत.
‘स्व-पराजय करणारी वागणूक ते समृद्ध करणारी वागणूक’ हे रूपांतर घडवून आणण्यासाठीचा अ‍ॅक्शनप्लॅन असलेले, आनंदाच्या मार्गातील अडथळे दूर करून तुम्हाला हवं तसं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आवर्जून वाचा…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये