ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

‘आशेच्या भांगेची नशा भारी…’; नागराज मंजूळेनं शेअर केलं, नव्या चित्रपटाच पोस्टर

मुंबई : (Ghar Banduk Biryani) मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा ‘घर, बंदूक, बिरयानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतंच नागराजनं या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

नागराजनं ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, ‘आशेच्या भांगेची नशा भारी… झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे घेऊन येत आहेत नवाकोरा चित्रपट. ‘घर, बंदूक, बिरयानी’ 30 मार्च 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित.’ नागराजनं शेअर केलेल्या या पोस्टरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. जवळपास पाच हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या नागराजच्या या पोस्टला लाइक केलं आहे. तर अनेकांनी या पोस्टला कमेंट करुन नागराजला त्याच्या या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. ‘ट्रेलर कधी रिलीज होणार?’ असा प्रश्न देखील काही युझर्सनं पोस्टला कमेंट करुन विचारला.

‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटात स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच नागराजसोबतच सयाजी शिंदे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे.

या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणाला, “झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो. या वेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन आलो आहोत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याबाबत विचारणाही होत होती. आता लवकरच या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये