‘अमृताला नेत्रकटाक्ष देत…’; प्राजक्ता माळीची ‘ही’ पोस्ट चर्चेत
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असते. त्याचबरोबर आता प्राजक्ता पुन्हा एकदा तिच्या नवीन पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसल्याचं दिसतं आहे. तिचा चित्रपटातला हा लूक शेअर करत कशी वाटली नैना चंद्रापूरकर? मला तर बुवा शिवलेली नव्हे खरी नऊवार नेसून, सगळे खरे सोन्या- मोत्याचे दागिने घालून, प्रिय अमृताला खडूस नेत्रकटाक्ष देत नाचायला जाम मज्जा आली, असं प्राजक्तानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, प्राजक्ता आणि अमृताने चंद्रमुखी चित्रपटातील सवाल जवाब लावणी करताना दिसत आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.