सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटला ‘ग्लोबल एज्युकेशन २०२२ ॲवॉर्ड

पायोनिअर इन्स्टिट्यूट फॉर बीएस्सी (सीएस अँड डीएस) इन इंडिया
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी महाविद्यालयाला ‘पायोनिअर इन्स्टिट्यूट फॉर बीएस्सी (सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्स-सीएस अँड डीएस) इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अचिव्हमेंट अॅवॉर्डस २०२२ सोहळ्यात ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हॉपनॉच फाउंडेशन, इंडिया न्यूज आणि आऊटलूक व मेडगेट टुडेने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी लोकसभा खासदार मनोज तिवारी, दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा योगिता सिंग, अभिनेत्री इशा देओल यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी ‘सूर्यदत्त’मध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, आधुनिक व डिजिटल युगात अनेक क्षेत्रात क्रांती होत आहे. डिजिटल गोष्टींचा वापर वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इंटरनेटचा प्रभाव मोठा आहे. परिणामी, सायबर सिक्युरिटीचा प्रश्नही निर्माण झाला असून, बँकिंगसह इतर मार्गांनी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सायबर सिक्युरिटी हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सर्वप्रथम ‘सूर्यदत्त’ने सायबर सिक्युरिटीबाबतचा अभ्यासक्रम सुरू केला. या क्षेत्रात संस्थेची दमदार वाटचाल सुरू असून, दर्जात्मक शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. संस्थेच्या यशाबद्दल प्रा. आरिफ शेख, अंजली मुळीक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे त्यांनी अभिनंदन केले.
या सर्व सहकार्यांच्या, सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. सायबर सुरक्षेविषयी जनजागृती वाढत आहे. भारताला डिजिटल साक्षर व सुरक्षित करण्याचा प्रयत्न सूर्यदत्तच्या वतीने करत असल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले. यामुळे ‘सूर्यदत्त’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.