क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यातील वाघोली भागात गोडाऊनला भीषण आग; तीन जणांचा मृत्यू

पुणे : (Godown Fire IN Wagholi) पुणे शहरालगतच्या वाघोली भागामध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, या आगीचे मोठे लोळ आकाशात आग ओकत होते, त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

शहरातील वाघोली भागात काल (शुक्रवारी) रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आगीची घटना घडली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत ४ सिलेंडर फुटलेत. आगीची घटना समजताच त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

या घटनेत तीन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेल नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर आता कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील धोका टळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये