‘बिग बॉस’मध्ये शिव ठाकरेशी भांड भांड भांडली अभिनेत्री; आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये शिवला देणार टक्कर?

Khatron Ke Khiladi 13 : टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि साहसी रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ सीझन 13 धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. सध्या सर्वत्र ‘खतरों के खिलाडी’ सीझन 13 ची चर्चा सुरु झाली आहे. ‘खतरों के खिलाडी’ सीझन 13 साठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एवढंच नाही तर रोहित शेट्टी शोमध्ये स्पर्धकांना कोण-कोणते भयानक खेळ खेळायला लावणार याकडे देखील चाहत्यांचं लक्ष आहे. महत्त्वाचं म्हणजे नुकताच शोच्या स्पर्धकांची यादी लीक झाली आहे. ज्यामुळे ‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ मध्ये कोण झळकणार हे चाहत्यांना कळालं आहे. त्यामध्ये शिव ठाकरेच्या (Shiv Thakare) नावाची जोरदार चर्चा रंगली. ‘कुंडली भाग्य’ फेम रुही चतुर्वेदी (Ruhi Chaturvedi) आणि अंजुम फकीह (Anjum Fakih) यांची नावे निश्चित स्पर्धकांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत, आता ‘बिग बॉस’ची ‘यंदाची ड्रामा क्वीन’ अर्चना गौतमनेही (Archana Gautam) आपणसुद्धा रोहित शेट्टीच्या स्टंट शो खतरो कें खिलाडीचा भाग असणार असल्याचा खुलासा केला.
‘ईटाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत अर्चना गौतम म्हणाली की, ‘लोकांनी आणि चाहत्यांनी मला दिलेले प्रेम आणि पाठिंबा पाहून मी भारावून गेले आहे. खतरों के खिलाडी 13 मार्फत पडद्यावर परत येण्यासाठी मी स्वतः खूप उत्सुक आहे. बिग बॉस-16 ने मला खूप काही शिकवले आहे. मी तिथे धैर्याने आणि संयमाने वागायला शिकले. कधीही हार न मानण्याच्या माझ्या ब्रीदवाक्यासह मी पुन्हा एकदा नवीन आव्हानासाठी खूप उत्साही आहे.