राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवा अन्…”; पडळकरांची टीका

पुणे : (Gopichan Padalkar On Sharad Pawar) भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आसतात. गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी हा संघर्ष कायम गाजत असतो. पडळकर पवार कुटुंबावर टीका करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. त्यामुळे सतत वाद होत असतो. गुरूवारी पडळकर दौंडमधील कुसेगाव पाटसमध्ये आले होते. त्यांनी धनगर मेंढपाळ बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना पडळकरांनी “जयंत पाटील अक्कल नसलेला माणूस आहे. त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका, तुमची आयडीयालॉजी काय होती. तुम्ही शिवसेनेशी जुळवून घेत होता. तेव्हा सुद्धा तुम्ही सत्तेसाठीच लाचारी पत्करली होती. आशा भाषेत पाटलांवर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सत्तेशीवाय राहू शकत नाही अशी टीका केला होती. तर निवडणूक आयोगाने एक चुक केला त्यांनी राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून त्यांनी खंजिर हे चिन्ह दिलं पाहिजे अशी टिका यावेळी पडळकारांनी यावेळी केली आहे.