ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘सुप्रिया-अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’, गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली

पुणे : (Gopichand Padalkar On Ajit Pawar) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “सुप्रिया सुळे, अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी याआधीदेखील शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खुप खालच्या शब्दात टीका केलीय. पण आता अजित पवार सत्तेत आहेत. असं असतानाही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे पडळकरांच्या टीकेवरुन नवा वाद निर्माण होण्यची शक्यता आहे.

पडळकर म्हणाले,“अजित पवार यांची भावना आमच्या विषयी स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिलंय”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये