“पडळकरसारख्या विकृत औलादीला थांबवावं नाहीतर…”; रूपाली ठोंबरे-पाटील आक्रमक!

पुणे – Rupali Thombre-Patil | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना बाळासाहेबांनी केलेल्या टीकेचा दाखला देत निशाणा साधला होता. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी पडळकरांंना प्रत्युत्तर दिलं आहे.
गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत. अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल. ते सतत शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर तोंडसुख घेत असतात. भाजप नेते स्वत:ला सुसंस्कृत समजतात पण त्याच लोकांच्या या भावना आहेत, असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांना पवारांवर टीका करता येत नाही म्हणून गोपीचंद पडळकरांसारख्यांना उभं करून तोंडसुख घ्यायचं, असं म्हणत रूपाली पाटील यांनी भाजपवरही निशाणा साधला. जर हे पुढे थांबलं नाही तर त्यांनाही त्याचा भाषेत मिळणार असल्याचं म्हणत रूपाली पाटील यांनी इशारा दिला आहे.