ताज्या बातम्यामहाराष्ट्रहिस्टाॅरिकल

आजींना मानाचा मुजरा! वयाच्या 76 व्या वर्षी सर केला रायगड, फोटो होतोय व्हायरल!

रायगड : आजकाल कट्यावर बसून टिंगल टवाळकी करणारे तरूण आपल्याला भरपूर दिसतील. गोवा, केरळ, तिरुपती फिरणारे ही भरपूर आसतात. पण इतिहास जपणारे, त्याला जागृत ठेवणारे, गडकिल्ल्यांचे संवर्धन करणारे खुप कमी असतील. पण काल रायगडावर शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमीत्ताने तरूणाईला ही लाजवेल अशी एक घटना घडली. चक्क एका ७६ वर्षाच्या आज्जीने डोक्याला फेटा, हातात काठी आणि तोंडी शिवगर्जना देत रायगड सर केला.

दरम्यान, साठ-सत्तरच्या वयातील जेष्ठ लोक घराच्या बाहेर पडायला घाबरतात. ज्या वयात तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळ, देव-देव करायचा अशा वयात रायगडसह एक ना दोन तब्बल १० गडकिल्ले सर करणाऱ्या आऊबाई भाऊ पाटील या रा. दिंडनेर्ली ता. करवीर जि. कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या मनात शिवाजी महाराज यांच्याविषयी असलेली अपार श्रद्धा, प्रेम, आदर हे सर्व यांच्या मुखातून पडणाऱ्या घोषणांमधून स्पष्ट दिसत होते.

दरम्यान, आज्जीबाईंच्या हिंमतीची दाद म्हणून त्यांच्यासोबत रायगडावर प्रत्येक जन जयघोष करत होता. आजीबाई सोबत ये-जा करणाऱ्या हजारो तरूणांनी फोटो, सेल्फी, व्हिडिओमुळे सोशल मीडियावर त्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये