ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळीसिटी अपडेट्स

दादांची दादांवर कुरघोडी?

पालकमंत्री चंद्रकांतदादा, बैठका घेत आहेत अजितदादा!

पुणे | Pune News – पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण, असा सवाल आता पुणेकरांना पडला आहे. पुणेकरांसह हाच प्रश्न आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील पडला आहे. कारण राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात प्रशासकीय बैठका घेण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) असतानाही अजित पवार हे सुपर पालकमंत्री असल्यासारखे वावरताना पाहायला मिळत आहे. हाच प्रश्न संपूर्ण पुणेकर दबक्या आवाजात बोलताना दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांना सध्याचे असणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रितच करण्यात आले नाही. त्याआधीही अजित पवारांनी अशा सभा घेण्याचे नियोजन केले होते. दरम्यान, सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तुमच्याकडे सुपर पालकमंत्री म्हणून पाहिले जाते, असे विचारले. त्यावर अजित पवार म्हणाले की, तुझ्या तोंडात साखर पडो! पालकमंत्रिपदावरून त्यांनी बीडमध्ये विधान केले होते. बीडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला होता.पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

याआधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या, तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मविआच्या काळात पालकमंत्री असताना पुणे, पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, अन्य प्रश्न, रखडलेले प्रकल्प याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. पण महाराष्ट्रात शिंदेंच्या बंडामुळे सरकार पडले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद आले. त्यानंतर राष्ट्रवादीही फुटून सरकारमध्ये सामील झाली आहे.

अजित पवार यांच्याकडे सध्या उपमुख्यमंत्रिपद, अर्थमंत्रिपद आहे, पण पालकमंत्रिपद नाही. तरीही पुण्यात प्रशासकीय बैठका घेणे अजित पवारांनी कायम ठेवले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सत्तेत असूनही अजित पवार हे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आव्हान असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याच्या चर्चा सध्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अजित पवार मविआच्या काळात पालकमंत्री असताना पुणे, पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, अन्य प्रश्न, रखडलेले प्रकल्प याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. पण महाराष्ट्रात शिंदेंच्या बंडामुळे सरकार पडले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. त्यानंतर राष्ट्रवादीही फूटून सरकारमध्ये सामी झाली. अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद नाही. तरीही पुण्यात प्रशासकीय बैठका घेणे अजित पवारांनी मात्र कायम ठेवले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सत्तेत असूनही अजित पवार हे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आव्हान असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याच्या चर्चा सध्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अजितदादांकडे बैठकीचे नेतृत्व

सोमवारीदेखील पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली. सरकारी अधिकाऱ्यांकडून तसाच एक संदेश देण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना आमंत्रण असले तरी बैठकीचे नेतृत्व अजितदादा यांनी केले. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट चंद्रकांत पाटील यांच्यावर कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे.

म्हणून मी बैठका घेतो

तुम्ही पालकमंत्री असताना दर आठवड्याला बैठका घेत होतात. पण चंद्रकांतदादा का घेत नाहीत, असा सवाल अजित पवारांना केला असता, ते म्हणाले, की मला वाटतं, माझ्या बैठकीचा परिणाम ७ दिवस राहणार म्हणून पुन्हा मी पुन्हा बैठक घेतो. काहींना वाटते, आपल्या बैठकीचा परिणाम १-२ महिने राहणार. त्यामुळे ते तेवढ्या दिवसांच्या फरकाने बैठका घेतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये